गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाला रमेश पाटील यांच्याकडून एक कोटी रुपयांची देणगी

पुणे, १५
एप्रिल:
काेणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा
मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी
व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते
 रमेश पाटील आणि  मनीषा पाटील   यांनी तेजनाथ बाबा यांच्या
उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला एक काेटी रुपयांची देणगी दिली.
यावेळी डाॅ. पाटील बाेलत हाेते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर
, कार्यकारी
उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर
, सल्लागार  शंकर नारायण, उद्याेजक
अशाेक खांदवे
, रमेश पाटील यांचे कुटुंबीय  यावेळी उपस्थित हाेते.

डाॅ. अजिंक्य पाटील म्हणाले, गाेरगरीबांसाठी
शिक्षण उपलब्ध व्हावे असे स्वप्न मी पाहिले आहे. फी भरता आली नाही म्हणून काेणी
शिक्षणापासून वंचित राहायला आहे. असे व्हायला नकाे. त्यासाठीच शैक्षणिक निधी
उभारण्याचा मानस आहे. रमेश पाटील यांच्या देणगीने याची सुरूवात झाली आहे.

रमेश पाटील म्हणाले, आपण
समाजाचे काहीतरी देणे लागताे हा संस्कार डाॅ. डी. वाय. पाटील यांनी दिला. त्यांनी
दाखविलेल्या मार्गावर काम करत आहे.

डाॅ. एकनाथ खेडकर म्हणाले, समाजकार्यात
वाहून घेतलेले सर्वच जण वंदनिय असतात. रमेश पाटील यांचे शैक्षणिक कार्य माेठे आहे.

तेजनाथ बाबा यांनी या
कार्यक्रमास शुभाशिर्वाद दिले.

  • Related Posts

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    मुंबई (महाराष्ट्र), अप्रैल 10 : अराइया बाय अज़ा, एक नेक्स्ट–जनरेशन फाइन ज्वेलरी ब्रँड, आपल्या नैतिक पद्धतीने तयार केलेल्या लॅब–ग्रोउन डायमंड ज्वेलरीद्वारे आधुनिक लक्झरीची व्याख्या नव्याने करत आहे. नवकल्पना, शाश्वतता आणि…

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    नई दिल्ली, मार्च 26: वित्त आणि लेखा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ACCA आणि CFA या दोन पदव्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जातात. २०२६ मधील बदलती आर्थिक परिस्थिती आणि…

    You Missed

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे!  ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी